नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
ट्वीटरद्वारे मराठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.
अमित शाह
देशाला स्वराज्य, सुशासन, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा संदेश देणाऱ्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या वीरभूमी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.
स्मृती इराणी
पुरोगामी विचारांची जननी आणि संतांची भूमी असं महाराष्ट्र राज्य नेहमीच सुजलाम सुफलाम असावं! औद्योगिक प्रगती आणि जन-विकासाच्या जोडीनं, राष्ट्र उभारणीसाठी योगदान असलेल्या महाराष्ट्राची कायम उन्नती व्हावी, ही सदिच्छा! सर्व मराठी बंधु भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पियुष गोयल
महाराष्ट्राने भारताला कला, साहित्य, राजकारण, समाजकारण अश्या अनेक गोष्टींचा वारसा दिला ! संघर्ष, त्याग, तप अश्या भावना मनामनात रुजवल्या. संपूर्ण भारताला दिशा दाखवणारी अनेक नेतृत्व याच महाराष्ट्राने दिली. सर्व महाराष्ट्र बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र