अमरावत : नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्या उद्धव ठाकरेंनी खरी शपथ घेतली असेल असे वाटत नसल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगितले होते की, अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे सांगून अमित शहा यांनी ऐनवेळी गद्दारी केली. उद्धव ठाकरेंच्या या शपथेवर खासदार नवनीत राणा यांनी निशाणा साधला बाळासाहेब ठाकरे सांगत होते की ज्या दिवशी माझी युती काँग्रेस सोबत करायची वेळ आली तर माझी दुकान बंद करेल. त्याच उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे व गद्दारी कोणी केली हे आम्हाला माहिती आहे असा टोला देखील राणा यांनी लगावला. बिहारमध्ये जेडीयूला कमी सीट असूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले होते. त्यामुळे अमित शहा असे वागतील यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी खरी शपथ घेतली याविषयी संशय असल्याची टीका राणा यांनी केली.
यावेळी अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर सुद्धा नवनीत राणा यांनी भाष्य केले लोकांनी त्या पार्टीची व कार्यकर्त्याची क्षमता पाहून मदत केली पाहिजे जर क्षेत्राचा विकास करायचा असला तर राज्यात व केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर जाऊन आपण विकास केला पाहिजे,गद्दारी उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत केली तर अमित शहा गद्दारांना संपून देणार नाव आहे असा प्रहार त्यांनी उद्धव ठाकरेवर केला.