पणजी: भारतीय टपाल विभागाकडून आगामी 14 जुलै रोजी पोस्टल पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा टपाल विभाग, पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात दुपारी 2.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. गोवा टपाल विभागात गोव्यासह महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवृत्तीवेतन आणि निवृत्ती लाभासंबंधीच्या तक्रारी/तक्रार टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेले, मयत व्यक्ती आणि ज्यांचे निवृत्तीवेतन तीन महिन्यांत निकाली काढण्यात आलेले नाहीत, अशा तक्रारी पेन्शन अदालतीमध्ये स्वीकारल्या जातील. पोस्टल पेन्शन अदालतमध्ये केंद्रीय न्याय प्राधीकरण (कॅट), न्यायप्रविष्ट प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणासंबंधी तक्रारी यासारख्या पूर्णपणे कायदेशीर समस्यांचा समावेश असणारी प्रकरणे विचारात घेतली जाणार नाहीत. विहित नमुन्यात अर्ज करुन महेश एन. लेखाधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, पोस्ट मास्तर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी-403001 पत्त्यावर 8 जुलैपूर्वी पाठवावे, त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे टपाल कार्यालयाने कळविले आहे.