नवी दिल्ली: पीएम किसान योजनेच्या लाभार्थींन योजनेच्या टप्प्यांत मिळणार्या हप्त्यांसाठी शासनाने केवायसी व्हेरीफिकेशन बंधनकारक केले आहे. 31 जुलैपर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करण्याबाबतची नोटीस शासनाने जारी केली आहे. जे लाभार्थी 31 जुलैपर्यंत केवायसी करणार नाहीत त्यांचे शेवटचे हप्ते अटकण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत पीएम योजनेच्या 11 हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकर्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही धनराशी दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. मात्र, या योजनेत अनेक असे लोक आहेत जे शेतकरी नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा फसवणूकदारांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने केवायसी बंधनकारक केले आहे.