फडणवीसांची सरसंघचालकांशी बंदद्वार चर्चा

The Political Observer Staff By The Political Observer Staff
1 Min Read

नागपूर: राज्याच्या राजकारणातील उलथापालथीनंतर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे 45 मिनीटे बंदद्वार चर्चा केली.

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे आणि किचकट राजकीय समीकरणे यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री 9.15 वाजता नागपुरातील संघ मुख्यालयात पोहचले. विमानतळाहून थेट संघ मुख्यालयात डेरेदाखल झालेल्या फडणवीसांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर रात्री 10 वाजता फडणवीस मुख्यालयातून बाहेर पडले. यापूर्वी 5 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी शिवसेनेशी झालेले मतभेद आणि सत्ता स्थापनेतील अडचणी यापार्श्वभूमीवर फडणवीसांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी फडणवीसांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे.

Share This Article
Leave a comment