मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मोरे यांचा मुलगा रुपेश याचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी मागत त्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दरम्यान या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा पोलिसांना संशय आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
रुपेश मोरे याच्या व्हाट्सअप मोबाईलवर अन्फियाशेख या मुली सोबत विवाह झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवून “हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना नही तो आपके उपर रेप के केस कर देंगे” असा धमकीचा मेसेज रुपेश मोरे याला करण्यात आला आहे.
त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला “मै अल्फिया शेख ३० लाख रुपये नही दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी” अशा पद्धतीचा मेसेज पाठवला गेला.
पुन्हा काही दिवसानंतर “दे रहा है क्या पैसा नही तो मार दूंगा तेरी पुरी सेटिंग हुई है बहुत जल्द मार देंगे तेरे को गोली मार के जायेंगे तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए” असा धमकीचा मेसेज करून तीस लाख रुपयांची मागणी केली आहे.
यापुर्वीही रुपेश मोरे याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने रूपेश याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती. चिठ्ठीत ‘सावध रहा रूपेश’ असा मजकूर लिहण्यात आला होता.