देशातील 11 राज्यांमध्ये झाले 100 टक्के मतदान
नवी दिल्ली: देशाच्या 16व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी सोमवारी संसद आणि राज्यांच्या विधानसभांसह 31 ठिकाणी मतदान झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह देशातील विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या 4 हजार 796 सदस्यांनी मतदानात भाग घेतला. मतदानाची टक्केवारी 99.12 इतकी होती. तर 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के मतदान झाले
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा हे संसद भवन आणि 30 राज्यांच्या विधानसभांमध्ये राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांमध्ये 771 खासदार आणि 4025 आमदारांचा समावेश आहे. त्यापैकी 763 खासदार आणि 3991 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुद्दुचेरी, सिक्कीम आणि तामिळनाडूमध्ये 100 टक्के मतदान झाले.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अनंत कुमार सिंग आणि महेंद्र हरी दलविक या दोन आमदारांना आज मतदान करू दिले गेले नाही. त्यांना संबंधित न्यायालयांनी लोकप्रतिनिधी कायद्यान्वये अपात्र ठरवले आहे. याशिवाय राज्यसभेत 5 आणि काही राज्यांच्या विधानसभांमध्ये 6 पदे रिक्त आहेत. संसद आणि विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती पदासाठी मतदान करू शकत नाहीत. या निव़डणुकीत एकूण 4796 मतदार होते.
आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्याच्या विधानसभांमध्ये मतदानासाठी 40 खासदारांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर 9 आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि 2 आमदारांना इतर विधानसभेत मतदान करण्याची परवानगी होती.यावेळच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. तामिळनाडू विधानसभेत 2 कोरोना संक्रमित विधानसभा सदस्यांनी मतदान केले. तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि आरके सिंह यांनी कोविड-19 शी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करून पीपीई परिधान करून मतदान केले. विविध राज्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सीलबंद मतपेट्या घेऊन रस्ते आणि हवाई मार्गाने दिल्लीत पोहोचण्यास सुरुवात केलीय. विमानतळ ते संसद भवनापर्यंत मतपेट्यांची सुरक्षित हालचाल होण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
सध्या केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा नाही. राज्याच्या लोकसंख्येवर आमदारांच्या मताचे महत्त्व ठरते. त्यानुसार एकूण खासदारांच्या मताचे मूल्य 5,43,200 आणि एकूण आमदारांच्या मतांचे मूल्य 10,86,431 इतके आहे. खासदारांच्या मताचे मूल्य 700 आहे.त्याचवेळी, निवडणूक आयोगाच्या मते, विधानसभेच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य पुढीलप्रमाणे आहे. आंध्र प्रदेश 159, अरुणाचल प्रदेश 8, आसाम 116, बिहार 173, छत्तीसगढ 129, गोवा 20, गुजरात 147, हरियाणा 112, हिमाचल प्रदेश 51, झारखंड 176, कर्नाटक 131, मध्य प्रदेश 131, महाराष्ट्र 1251, महाराष्ट्र 1251, केरलपुर 17, मिझोरम 8, नागालँड 9, ओडिशा 149, पंजाब 116, राजस्थान 129, सिक्कीम 7, तामिळनाडू 176, तेलंगणा 132, त्रिपुरा 26, उत्तराखंड 64, उत्तर प्रदेश 208, पश्चिम बंगाल 151, दिल्ली 581, पुद्दुचेरी 16 मते आहेत.